![]()
पत्नीला सासरी नांदायला येत नसल्याने ४० वर्षीय मूकबधीर पतीने चक्क मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले. पत्नीचा फोटो असलेले बॅनर टॉवरवर झळकवत त्याने चार तास टॉवरवर ठिय्या मांडला. अखेर पत्नीने टॉवरजवळ येऊन व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधल्यानंतर पोलिसांनी त्याला खाली उतरवले. सोमवारी (७ सप्टेंबर) सकाळी लोहा बसस्थानकाच्या मागील परिसरात ही घटना घडली. लोहा शहरातील अफिया गफार घोडके यांचा विवाह एप्रिल २०२४ मध्ये मुखेड तालुक्यातील शादुल मकदुम दौलताबादी याच्याशी झाला. दोघेही मूकबधीर आहेत.
Source link
पत्नी नांदत नसल्यामुळे पतीचा टॉवरवर ठिय्या:लोह्यात पत्नीने व्हिडिओ कॉल केल्यावर उतरला खाली