![]()
कावड मिरवणुकीत डीजे सोबतच पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे वादनही विशेष आकर्षण ठरले. ढोलाच्या ठेक्यासोबत तरुणाईने कावड उत्सवाचा जल्लोष साजरा केला. प्रशासनानेही डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला काही मंडळांकडून प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. शहरातील शिवभक्त मंडळांकडून आकर्षक पालख्या आणि भव्य कावडी शिस्तीत मार्गस्थ केल्या जातात. कावड खांद्यावर घेतलेले शिवभक्त, भगवे झेंडे, सजविलेल्या पालख्या आणि त्यामागे सुरू असलेले ढोल-ताशांचे वादन असे चित्र मिरवणुकीत काही िठकाणी पाहायला मिळाले. ‘डीजे’च्या गाण्यांवर तरुणाई जल्लोष करत असतानाच काही मंडळांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांचे वादन केले. ढोल-ताशा पथकांच्या मिरवणुकीतील सहभागाने भाविकांचे लक्ष त्याकडे वेधले जात होते. ढोल-ताशा पथकांमध्येही तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’, या जयघोषासह कावड यात्रेतील ढोल-ताशांचा तालावर शिवभक्त जल्लोष साजरा करत होते.
Source link
पारंपरिक ढोल-ताशांवर शिवभक्तांनी धरला ठेका:कावड-पालखी मिरवणुकीत तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग