![]()
टीव्ही सेंटरमध्ये एका ७५ वर्षांच्या दिव्यांग भिक्षेकऱ्याचा मृतदेह सोमवारी (७ सप्टेंबर) आढळला. नशेच्या वादातून एका नशेखोराने या वृद्धाच्या डोक्यात त्यांचाच वॉकर मारून ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास टीव्ही सेंटर भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर एका वृद्धाचा मृतदेह पडलेला असल्याची बाब एका नागरिकाच्या निदर्शनास आली. त्यांनी डायल ११२ वर माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. टीव्ही सेंटरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडल्याने पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास : गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल देशमुख, विशाल सोनवणे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले. या आधारे संशयित आरोपी अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण याला ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीनंतर गुन्हा दाखल होणार मृत ७५ वर्षीय दिव्यांग भिक्षेकऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी सध्या सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. नशेवरून वाद; वॉकरने डोक्यात प्रहार : प्राथमिक चौकशीत अकबर हा नशेच्या आहारी गेलेला असल्याचे समोर आले. रात्रीच्या वेळी त्याचा मृत भिक्षेकऱ्याशी दारू पिण्यावरून वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या अकबरने वृद्धाच्या वॉकरनेच त्यांच्या डोक्यात प्रहार केल्याचे तपासात समोर आले. गंभीर दुखापतीमुळे वृद्धाचा मृत्यू झाला.
Source link
संभाजीनगरातील टीव्ही सेंटर परिसरात वादातून दिव्यांग भिक्षेकऱ्याचा खून:डोक्यात वॉकर घातले, आरोपी ताब्यात; सिडको पोलिसांत घटनेची नोंद