महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुणे आणि कोल्हापुरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वाढत्या असंतोषाच्या पा
.
आयोगाचे पूर्णपणे अधःपतन
संजय राऊत यांनी MPSC च्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सध्या लोकसेवा आयोगाची रचना अत्यंत राजकीय स्वरूपाची झाली आहे. आयोगाचे पूर्णपणे अधःपतन झाले असून, पूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त असणारे अधिकारी या आयोगाचे चेअरमन असायचे. आता मात्र देशातल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत केवळ एका विशिष्ट राजकीय विचारांचीच माणसे नेमली जातात, ज्यांची तिथे बसण्याची अजिबात कुवत नाही.”

‘मोदींकडून विद्यार्थ्यांची चेष्टा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “जे विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत, आत्महत्या करत आहेत, त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी खिदीखिदी हसतात. मोदी या मुलांना ‘दिमागी नक्षल’ म्हणतात आणि होमिओपॅथीची गोळी दिल्याची चेष्टा करतात. देशाचे पंतप्रधानच जर तरुणांची अशी चेष्टा करत असतील, तर या देशाचे कसे होणार?” असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
समित्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा
राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका करताना राऊत म्हणाले की, हजारो विद्यार्थी रस्त्यावर असताना सरकार नेहमीप्रमाणे केवळ एक कमिटी स्थापन करून वेळ मारून नेत आहे. या प्रश्नावर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार पुन्हा एकदा त्यांच्या ‘चंपतराय’ यांनाच पाठवेल, असा टोला त्यांनी लगावला. ज्या दिवशी मुख्यमंत्री संविधानिक संस्थांमध्ये आपल्या मर्जीतली आणि राजकीय माणसे बसवणे बंद करतील, त्याच दिवशी या राज्यातील विद्यार्थ्यांना खरा न्याय मिळेल, असे म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा..
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 11वा दिवस: मध्यरात्री प्रकृती खालावली, अडीच वाजता मंत्र्यांचा फोन; मराठा आंदोलक आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतर ठोस कार्यवाही होत नसल्याने जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. दरम्यान, काल रात्री मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती समोर आली. त्यांचे वजन कमी झाले असून शुगर आणि रक्तदाबही कमी झाल्याचे सांगण्यात आले. रात्री अडीच वाजता त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यानंतर ही माहिती सरकारमधील मंत्र्यांना देण्यात आली. सविस्तर वाचा