![]()
पुणे रेल्वे स्थानक परिसरात गांजा पिणाऱ्या टोळक्याला हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस शिपायावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अक्षय बंबाल असे या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानक परिसरात काही जण गांजा पीत बसले होते. कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस शिपायाने त्यांना हटकले. तसेच परिसरातून निघून जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने टोळक्यातील एकाने कोयता काढून पोलीस शिपायावर हल्ला केला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पुणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणारे आणि घातक शस्त्रे बाळगणारे टोळके सक्रिय असल्यास प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरात पोलीस गस्त वाढवणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियमित लक्ष ठेवणे आणि संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. रेल्वे पोलीस, शहर पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने एकत्र मोहीम राबवून अमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू भरधाव एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिवे घाटात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला. या प्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गौरव राजेंद्र चव्हाण (वय २३, रा. आमराई, बारामती, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात सहप्रवासी ऋषीकेश आबा खरात (वय २३, रा. आमराई, बारामती, जि. पुणे) जखमी झाला. खरात याने याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Source link
पोलिस शिपायाने गांजा पिणाऱ्यांना हटवले, टोळक्याने कोयत्याने हल्ला केला:पुणे रेल्वे स्थानक परिसरातील घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह