Headlines

दिंडोरी:रणतळं ही छत्रपती शिवाजी महाराज यांची रणभूमी




दिंडोरीतील रणतळं हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार असलेला परिसर आहे. महाराजांनी येथे स्वतः लढा देत मोठा विजय मिळवला होता. हा पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे असून, पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून रोखून संस्कृती व परंपरेचे धडे द्यावेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांनी केले. रणतळं सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने भाजप जिल्हा महामंत्री रणजित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी गोसावी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दिलीपराव जाधव होते. गोसावी यांनी दिंडोरीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत रणतळं परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती दिली. आजच्या तरुण पिढीला आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक तुषार वाघ, सूत्रसंचालन योगेश बर्डे यांनी केले, तर आभार संतोष आंबेकर यांनी मानले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रासाठी छबु जगताप, उद्योग क्षेत्रासाठी सोमनाथ सोनवणे, शेती क्षेत्रासाठी शिवाजी बोरस्ते व विश्वासराव देशमुख, कॉम्रेड चळवळीसाठी दिनकर जाधव व आप्पा वटाणे, राजकीय क्षेत्रासाठी मनोज ढिकले, पत्रकारितेसाठी अशोक निकम, अध्यात्मिक क्षेत्रासाठी आयान शेख आणि आरोग्य क्षेत्रासाठी रंजना गांगोडे यांचा सन्मान करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *