Headlines

घोटी:कपारेश्वरला पर्यावरणपूरक दहीहंडी




येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी सह्याद्रीच्या कुशीत दहीहंडी उत्सव साजरा केला. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तळेगाव येथील कपारेश्वर डोंगरावर हा उत्सव पार पडला. नैसर्गिक कपारीत स्वयंभू कपारेश्वर महादेवाच्या मंदिरात अभिषेक व पूजन केले. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून दहीहंडी फोडण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपस्थित गिर्यारोहकांनी शिक्षकांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या डोंगराचे धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. समोरच उंटदरी व कसारा घाटाचा परिसर दिसतो. ठरत आहे. या उत्सवात मित्रमंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे, माजी नगराध्यक्ष अलका चौधरी, पल्लवी शिंदे, अभिजित कुलकर्णी, संजय शर्मा, डॉ. महेंद्र आडोळे, नीलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर, सुधाकर तांबे यांसह महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *