Headlines

गोपाळकाला:पैठण येथील आर्य चाणक्य विद्यामंदिरात ‘गोपाळकाला’, ‘शिक्षक दिन’ उत्साहात




पैठण येथील आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम व दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन आणि दहीहंडीच्या जल्लोषाने शाळा परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण, माता सरस्वती, संत ज्ञानेश्वर महाराज आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुगलकिशोर लोहिया होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पद्मकुमार कासलीवाल, विजय चाटुपळे, मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी व ज्ञानेश्वर उचित उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गोकुळातील कृष्णलीलेवर आधारित नृत्ये आणि नाटिका सादर केल्या. राधा-कृष्ण व गोपाळांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सुदाम पोल्हारे यांनी कृष्णजन्माष्टमीचे महत्त्व सांगितले, तर शिवराज धनसुरे व विलास खर्डेकर यांनी गवळण सादर केली. डीजेच्या तालावर ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘गोविंदा आला रे आला’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विविध गोविंदा पथकांनी सुरक्षेचे नियम पाळत मानवी मनोरे रचून सलामी दिली. अनेक प्रयत्नांनंतर एका पथकाने शिस्तबद्धपणे व कौशल्याने अंतिम टप्पा गाठत दहीहंडी फोडली. आर्य चाणक्य विद्यामंदिरात विद्यार्थी दहीहंडी फोडताना.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *