Headlines

शेतीमध्ये सेंद्रिय खताच्या वापरातून जमिनीचे आरोग्य जपा : कृषी सचिव:कृषी सचिव परिमल सिंह यांनी लासूर स्टेशन येथे खत विक्री केंद्राला दिली भेट‎




शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारण्याबरोबरच शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांकडे वळावे, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांनी केले. शुक्रवारी (दि. ४) त्यांनी माळीवाडगाव व लासूर स्टेशन परिसरात भेट देऊन शेतीतील प्रयोग, गांडूळ खत प्रकल्प तसेच ऑनलाइन खत वितरण प्रणालीची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी सिंह यांनी उघड्या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या गांडूळ खत व गांडूळ बीज उत्पादन प्रकल्पाची पाहणी करून नवीन बेडचे उद्घाटन केले. गांडूळ खतामुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय गवळी यांच्या कंबाईन हार्वेस्टरची पाहणी, पाणी फाउंडेशनच्या क्रांतिज्योती व जय भद्रा शेतकरी गटांच्या प्रतिनिधींशी संवाद आणि गोकृपा अमृत व वेस्ट डिकंपोजरची त्यांनी पाहणी केली. जिल्हा खत विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रकाशचंद मुथा यांनी खत खरेदीसोबत होणारी सक्तीची लिंकिंग, एफओआर पद्धतीने पुरवठा आणि मंजूर वाटपानुसार खतांचा अपुरा पुरवठा होणे, यांसारखे प्रश्न मांडले. विक्रेते व शेतकऱ्यांच्या या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन कृषी सचिवांनी लासूर स्टेशन येथील खत विक्री केंद्राला भेट दिली. परिमल सिंह यांनी दिले.या दौऱ्यात विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, विभागीय अधीक्षक कृषीअधिकारी डॉ. अभयकुमार पडिले, आत्माच्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव, उपविभागीयकृषी अधिकारी आनंद गजेवार, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, डॉ. सूर्यकांत पवार आणि गंगापूरचे तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी सचिव सिंह यांनी माळीवाडगाव येथे प्रयोगात्मक शेतीची पाहणी केली कृषी सचिव परिमल सिंह यांनी माळीवाडगाव येथील शेतकरी गोरखनाथ कचरू गोरे यांच्या शेताला भेट दिली. या वेळी त्यांनी शेवगा, जांभूळ लागवड आणि सामूहिक शेततळ्याची पाहणी केली. गोरे यांनी या पिकांचे अर्थशास्त्र आणि शेवग्यापासून बनवल्या जाणाऱ्या मोरिंगा पावडर निर्मितीची माहिती सचिवांना दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *