Headlines

सोयगाव-फर्दापूर मार्गावर 2 दुचाकींचा अपघात:एक ठार, एक गंभीर




सोयगाव-फर्दापूर मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव दुचाकीने मागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. विलास साईदास राठोड (२५, रा. वरखेडी तांडा, ता. सोयगाव) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव असून नीलेश रोहिदास चव्हाण (३५, रा. नांदातांडा) हा गंभीर जखमी झाला आहे. विलास साईदास राठोड व सोबत असलेला त्याचा मामेभाऊ अरविंद रमेश जाधव वय (१५) हे दोघेजण दुचाकीने (एमएच १९ एक्यू २३५५) घराकडे जात असताना मधेच दुचाकी थांबवली. अरविंद खाली उतरला व विलास दुचाकीवरच बसून होता. मागून दुचाकीवर (एमएच १९ एक्यू १२२८) नीलेश रोहिदास चव्हाण (३५, रा. नांदातांडा) हा वळण घेत होता. त्यावेळी अपघात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *