![]()
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आजच्या आज वेगाने पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा राज्यातील गावोगावी आंदोलने सुरू होतील, असा इशारा आमदार अंबादास दानवे यांनी दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. आमदार अंबादास दानवे म्हणाले, सरकारने जरांगे यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना दानवे यांनी कृत्रिम पावसाच्या मागणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कृत्रिम पाऊस असा पडत नाही. आतापर्यंत भारतात कुठे असा पाऊस झाला आहे? असा पाऊस झालेला नाही, असे ते म्हणाले. मराठवाडा आणि विदर्भ अवर्षणग्रस्त परिस्थितीत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आता दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे, असेही दानवे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. जरांगे यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली आहे.त्यामुळे सरकारने यावर लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे, असे चिखलीकर म्हणाले. लवकर तोडगा काढणे गरजेचे
Source link
सरकारने आजच तोडगा काढावा; अन्यथा गावोगावी आंदोलने होतील:जरांगेंच्या भेटीनंतर आमदार अंबादास दानवे यांचा इशारा