Headlines

खामगाव:वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त




x शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीवर वडोदबाजार पोलिसांनी कारवाई केली. दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांत दहशत निर्माण झाली. पहिली कारवाई ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बाबरा, ता. फुलंब्री येथे झाली. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह रवी मैंद यास ताब्यात घेतले. लाल रंगाचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाची ट्रॉली जप्त केली. ट्रॉलीत सुमारे एक ब्रास वाळू आढळली. एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई ६ सप्टेंबर रोजी शेवता येथे झाली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून वाळूची चोरटी वाहतूक करताना उमेश लक्ष्मण साठे हा पोलिसांच्या हाती लागला. लाल रंगाचे ट्रॅक्टर (एमएच २० एएस ८६६१) जप्त केले. ट्रॅक्टर-ट्रॉलीत सुमारे एक ब्रास वाळू आढळली. ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, अंमलदार प्रदीप सपकाळ, सचिन काळे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *