Headlines

रास्ता रोको:सकल मराठा समाजातर्फे चांदवडला उद्या रास्ता रोको




मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षणयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे दहा दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज चांदवड तालुक्याच्या वतीने बुधवारी (दि. ९) चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. जितेंद्र कोतवाल, पप्पू कोतवाल, दीपक हांडगे, संपतबाबा वक्टे, बाळासाहेब गाढे, नंदू पगार, घमाजी सोनवणे, बाळासाहेब शिंदे, सौरव देशमाने, दुर्गेश हिरे आदींसह सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांदवडचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना याबाबतचे निवेदन सादर केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *