![]()
बैलपोळा सणानिमित्त सारोळा येथे होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत बैलपोळा यात्रा शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. या वेळी एपीआय पवन इंगळे, बीट जमादार नीलेश शिरकर, गोपनीय शाखेचे बुढवंत, सरपंच मोहन गायकवाड, उपसरपंच, नारायण वराडे, पोलिस पाटील सुधाकर काकडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश काकडे, इम्रान काझी, गणेश वराडे, विष्णू दांडगे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू वराडे, प्रसाद वराडे, एकनाथ गोरे, मार्तंड वराडे, मच्छिंद्र दांडगे, जफर सय्यद, खलील सय्यद, आसेफ सय्यद, वाईद शेख आदी उपस्थित होते.
Source link
सारोळा:सारोळा येथे बैलपोळा यात्रेनिमित्त शांतता बैठक