![]()
तळेगाव दाभाडे परिसरात एका 21 वर्षीय तरुणीविरुद्ध अल्पवयीन मुलाला किस केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा 17 वर्षांचा असून, त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या हेतूने तरुणीने त्याला किस केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या 47 वर्षीय वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित 21 वर्षीय तरुणीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. आठ ते नऊ महिन्यांपूर्वी झाली ओळख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि आरोपी तरुणी हे एकमेकांचे लांबचे नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांची 8 ते 9 महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुलगा केवळ 17 वर्षांचा असल्याने तो कायद्यानुसार अल्पवयीन आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. केक कॅफेमध्ये नेऊन घेतला किस ही घटना 3 सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे परिसरात घडली. फिर्यादीनुसार, संबंधित तरुणी अल्पवयीन मुलाला तळेगाव दाभाडेमधील एका केक कॅफेमध्ये घेऊन गेली होती. तेथे तिने मुलाला किस केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 4 सप्टेंबर हेही वाचा.. जरांगे म्हणजे बिनबुडाचं गाडगं, त्यांच्यावर बोलणे व्यर्थ!:गुणरत्न सदावर्तेंची जरांगे पाटील आणि संजय राऊतांवर घणाघाती टीका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनातून संविधानिक व्यवस्था आणि आरक्षणाच्या कायदेशीर चौकटीला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला.सविस्तर वाचा..
Source link
लग्नाचा तगादा, कॅफेमध्ये 17 वर्षीय मुलाला किस:21 वर्षीय तरुणीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा