Headlines

गोंदियात भरधाव ट्रकची पिकअपला धडक:मध्य प्रदेशातील 6 मजूर ठार, 7 गंभीर जखमी




चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव ट्रकने (एमएच ३५ एजे २५४७) समोरून येणाऱ्या मजुरांच्या पिकअपला ( एमपी १५ टी ३४९५) धडक दिली. यात ३ वर्षांच्या बालकासह ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ गंभीर जखमी झाले. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा-मोहरानटोली येथे सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व मजूर मध्य प्रदेशातील बालाघाटचे रहिवासी असून, तेलंगणातील हैदराबाद येथे रोजगाराच्या शोधात निघाले होते. पिकअपमध्ये १२ मजूर होते. ट्रकचालकावर गुन्हा दाखल या अपघाताचा तपास गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जखमी मजूर राजेंद्र शिवचरण पंचाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकचा चालक मोहसीन खान (३२, रा. गोंदिया) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *