सरकारच्या मते मनोज जरांगे पाटील यांचा उपयोग संपला आहे. त्यांना मनोज जरांगे पाटील यांना मारायचे आहे, आता त्यांच्या उपोषणाचा सरकारने निवडणुकीत फायदा घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जरांगे पाटलांचे उपोषण सरकारसाठी गळ्याचा फास बनला आहे, असे खास
.
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशात जातात तेव्हा तिथल्या मशिदीमध्ये जात तिथल्या राष्ट्रप्रमुखांना आलिंगण देतात. त्यांना माझे भाऊ आहे असे म्हणतात तर दांडिया खेळण्यासाठी येण्यापासून का रोखतात, तिथे भाऊ आणि इथे शत्रु असे चालणार नाही.

अजित पवारांची मजबुरी होती
संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचा पक्ष हा भाजपसोबत आहे. भाजपने देशात आणि राज्यात जी भूमिका घेतली आहे ती देशहिताची नाही. अजित पवार यांची एक मजबुरी होती त्यामुळे ते भाजपसोबत गेले. पण मुळ जो पक्ष आहे तो शरद पवारांचाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच शरद पवारांनी केली. ते भाजपसोबत कधीही जाणार नाही, पण विलीनीकरण करायचे असेल तर ते एका बाजूने होत नाही.
नार्वेकरांच्या तोंडी पक्षांतर बंदी कायद्याची भाषा शोभत नाही
संजय राऊत म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी पक्षांतर बंदी कायद्यावर बोलू नये तो पक्षांतर बंदी कायद्याचा अपमान ठरेल. त्यांनी ज्या प्रकारचा निकाल शिवसेनेच्या बाबतीमध्ये दिला आहे त्यामुळे त्यांनी त्यांनी पक्षांतर बंदी कायद्यावर बोलूच नये. नार्वेकरांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही.
भाजपकडून प्यारे खानला सूट
संजय राऊत म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी जे गरब्याबद्दल वक्तव्य केले आहे त्यांचे मी स्वागत करतो. पण त्यांनी याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्र्यांना समजून सांगितले पाहिजे की हा देश आणि राज्यासाठी अनेक जाती-धर्मांच्या लोकांनी काम केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुस्लीम समाजाचे मोठे योगदान आहे. पण बेगडी हिंदुत्ववादी झालेले नेते आहे त्यांना अमृता वहिनींनी समजून सांगितले पाहिजे. उत्सवात जर सर्व जण येत असतील तर त्यामुळे सण मोठा होता. भाजपचे नेते मुस्लीमांना दांडिया खेळण्यास येऊ देणार नाही असे म्हणतात आणि दुसरीकडे प्यारे खान सारखा त्यांनीच नेमलेला माणूस मुंबईस्फोटातील आरोपीची भेट घेतो हे त्यांना चालते का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे.
शिवसेना घरोघरी आम्ही पोहोचवली
संजय राऊत म्हणाले की, धनुष्यबाणाचा निकाल तात्काळ लागयला हवा होता. कारण चोरलेल्या धनुष्यबाण चिन्हावर त्यांपी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला. हा धनुष्यबाण लोकांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही केले आहे आणि ते त्यांना फुकट मिळाले आहे, त्यामुळे ते चिन्ह गोठवले पाहिजे.
हे ही वृत्त वाचा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 12 वा दिवस:12 सप्टेंबरच्या राज्यव्यापी बैठकीत ‘मुंबई’ची तारीख ठरणार
आंतरवाली सराटी2 मिनिटांत

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. आंतरवाली सराटीमध्ये 12 तारखेला राज्यव्यापी बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख स्पष्ट केली जाणार आहे. काल मराठा आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यापूर्वी सरकार काही तोडगा काढणार का? हे पाहणं महत्त्वाचे आहे. वाचा सविस्तर