विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने नैराश्य आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षा वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पेपर
.
आत्महत्या करणारा तरुण कोण?
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रथमेश देशमुख असून, तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील रहिवासी होता. तो पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्याच्यावर अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. आर्थिक विवंचना आणि सतत होणारी पेपरफुटी यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा संशय आहे.
आणखी किती प्रथमेश गेल्यानंतर व्यवस्थेला जाग येणार?
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रथमेशच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत सरकारवर आगपाखड केली. त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. “प्रथमेशसाठी न्यायाची लढाई आता आपल्या सगळ्यांना मिळून लढायची आहे. ग्रामीण भागातील आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी स्वतःच्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि राज्याची सेवा करण्याचे स्वप्न घेऊन पुण्यात येतात. मर्यादित पैशांत भाडे, जेवण, पुस्तके यांचा खर्च भागवतात. मात्र, परीक्षांमधील अनियमितता, विलंब आणि उत्तरदायित्वाचा अभाव विद्यार्थ्यांवरील मानसिक आणि आर्थिक ताण वाढवतो. परीक्षेचा एक विलंब विद्यार्थ्यासाठी केवळ तारीख नसते, तर कुटुंबावर वाढणारा आर्थिक भार असतो.” “ज्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा, त्याच व्यवस्थेच्या अपयशाची किंमत विद्यार्थ्यांनी का मोजायची? आणखी किती प्रथमेश गेल्यानंतर या व्यवस्थेला जाग येणार?” असा अत्यंत बोचरा सवाल दिपके यांनी उपस्थित केला. तसेच, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
हा तर सरकारने घेतलेला बळी; MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काँग्रेस सक्रिय होती, तरीही सरकार पेपरफुटीच्या प्रश्नावर आपली जबाबदारी झटकत आहे. हे आंधळे-बहिरे सरकार असून, प्रथमेशची आत्महत्या हा सरकारनेच घेतलेला बळी आहे.” त्यांनी MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली. “जर अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांनीच भ्रष्टाचार आणि पेपरफुटी करण्यासाठी आपल्या मित्राची नियुक्ती केली आहे, असा त्याचा अर्थ निघेल,” असा घणाघाती आरोपही सपकाळ यांनी केला.
हेही वाचा…
अमृता वहिनींच्या भूमिकेचे स्वागत, पण फडणवीसांनी विष ओकणाऱ्या राणेंना आवरावे: जरांगे पाटलांचे आंदोलन सरकारच्या गळ्यात अडकलेली हड्डी- विजय वडेट्टीवार

दांडियाबद्दल अमृता फडणवीस यांनी चांगला विचार मांडला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगून विष ओकणाऱ्या नीतेश राणेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढले तर त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी