Headlines

राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुखांच्या जन्मगावी विकासाची प्रतीक्षा:प्रलंबित प्रकल्पांसाठी नातू गजानन देशमुखांचे थेट पंतप्रधानांना पत्र




राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथील प्रलंबित विकासकामे आणि कौशल्य विकास केंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत त्यांचे नातू गजानन देशमुख यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. अनेक वर्षे लोटूनही या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ​भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जन्म गावी कडोळी येथे डिसेंबर २०१६ मध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात नानाजी देशमुखांच्या जन्मगावी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमास शासनाचे वरिष्ठ मंत्री तसेच लोक प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु, त्यानंतर अनेक वर्षे उलटूनही या केंद्रासाठी आवश्यक असलेली जमीन अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, मागील आठ वर्षांपासून महाराष्ट्राचे महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचेच असूनही या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध न होणे अत्यंत विसंगत व खेदजनक असल्याचे पत्रात म्हटले आहे. गावातील अनेक मूलभूत आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लागलेली नाहीत विशेष म्हणजे आमदार आणि तत्कालीन खासदार यांनी कडोळी गाव दत्तक घेतले होते. या योजनेंमुळे गावाच्या विकासाला गती मिळेल अशी गावकऱ्यांची मोठी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात आजही गावातील अनेक मूलभूत आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लागलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या संघटनेच्या नेत्याने कडोळी येथे येऊन आंदोलनही केले होते. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत कामास सुरुवात केली असली, तरी यामुळे सत्ताधारी हा टीकेचे मुख्य लक्ष बनत चालला असल्याचे पत्रात नमूद केले आहे. भारतरत्न नानाजी देशमुख यांनी ग्रामविकास, स्वावलंबन, शिक्षण, कौशल्यविकास आणि समाजनिर्माण यांना आपल्या जीवनकार्याचा केंद्रबिंदू मानले होते. अशा महान व्यक्तीच्या जन्मगावी त्यांच्या विचार व कार्याला साकाराणारे प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे अत्यंत वेदनादायक असल्याचे गजानन देशमुख यांनी नमूद केले आहे. ​पंतप्रधानांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून महाराष्ट्र शासन व संबंधित प्रशासनाला तातडीने योग्य त्या सूचना द्याव्यात, कौशल्य विकास केंद्रासाठी लवकरात लवकर जमीन उपलब्ध करून द्यावी आणि कडोळी गावातील इतर प्रलंबित विकासकामे मार्गी लावावीत, अशी आर्त विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस: मराठ्यांचे वाटोळे करणारे तुम्हाला चालणार का? मराठ्यांच्या अंगावर मराठे सोडले तर शिंदे संपून जातील- जरांगे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. आंतरवाली सराटीमध्ये 12 तारखेला राज्यव्यापी बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख स्पष्ट केली जाणार आहे. काल मराठा आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यापूर्वी सरकार काही तोडगा काढणार का? हे पाहणं महत्त्वाचे आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *