Headlines

दिव्य मराठी ब्रेकिंग‎:आठवडाभर पाऊस लांबला तर राज्यात आपत्कालीन लोडशेडिंग, ट्रिपिंगची कारणे देऊन अघोषित लोडशेडिंगची ओरड




राज्यभरात पावसाने दडी मारल्याने कृषी व घरगुती क्षेत्रातून वीज मागणी वाढली आहे. पावसाळ्यात कृषी पंपांवर विजेचा वापर कमी असल्याने गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्याची वीज मागणी 26 हजार मेगावॅटवर होती. सध्या मागणी 29 हजार 600 मेगावॅटवर पोहोचली आहे. मागणी व पुरवठ्यात सरासरी 2500 मेगावॅटची तूट निर्माण झाली आहे. अजून आठवडाभर पाऊस लांबला तर तापमान वाढेल. घरगुती व कृषी क्षेत्रातून अचानक वाढलेल्या मागणीमुळे राज्यावर लोडशेडिंग लादले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यात यापूर्वी सन 2023 मध्येही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आपत्कालीन लोडशेडिंगची वेळ आली होती. लोडशेडिंग टाळण्यासाठी राज्य शासनाला खुल्या बाजारातून महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. तरीही सायंकाळी सातनंतर तूट कायम राहिल्यास भारनियमन लादले जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारनियमनाची ही प्रमुख 3 कारणे? कृषी फीडर्सवर लोडशेडिंगचा धोका 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवामुळे राज्याची वीज मागणी अजून काही प्रमाणात वाढू शकते. या काळात महावितरणला “पॉवर एक्स्चेंज’मधून ऐनवेळी महागडी वीज खरेदी करावी लागेल. संध्याकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत जेव्हा सार्वजनिक मंडळ घरगुती वापर व कृषी पंपांची मागणी एकत्र येईल तेव्हा मुख्य ग्रीड सुरक्षित ठेवण्यासाठी “राज्य लोड डिस्पॅच सेंटर’ काही कृषी फीडर्सवर ऐन गणेशोत्सवात तात्पुरती आपत्कालीन कपात लागू करू शकते. गणेशोत्सवात वीज मागणीत मोठी वाढ शक्य राज्याकडे मागणीनुसार पुरवठा करता येईल अशी पुरेशी वीज उपलब्ध असल्याने आपत्कालीन भारनियमन होणार नाही. आगामी काळात गणेशोत्सवात विजेची मागणी वाढेल. या काळातही मागणीनुसार वीजपुरवठा करण्याचे नियोजन महावितरणने यापूर्वीच केले आहे. -भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *