![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जळगाव महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने दोन तास तर कन्नड तालुक्यातील वाकोद-जामडी चौफुली येथे
.
भवन येथे जळगाव महामार्गावर झालेल्या आंदोलनात प्रतिभा गावंडे यांनी मुंबई आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी वारकरी संप्रदायाने अभंग व पावली सादर करून आंदोलनाला पाठिंबा दिला. तर वाकोद-जामडी चौफुलीवर झालेल्या पाऊण तासाच्या आंदोलनामुळे चिंचोली, सावखेड, पाचोरा व संभाजीनगर मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होऊन वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.