![]()
गणेशोत्सवासाठी अवघे ४ दिवस उरले असताना शहरातील बाजारपेठांमध्ये सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक आणि थर्मोकोलच्या साहित्याकडे ग्राहकांनी फिरवलेली पाठ आणि त्याला पर्याय म्हणून दाखल झालेले पर्यावरणपू
.
मागील काही वर्षांत थर्मोकोलचे मखर आणि प्लास्टिकच्या माळांचा बोलबाला असायचा. मात्र, यंदा बाजारपेठेत १०० टक्के पुनर्वापर करता येण्याजोगे आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा इको-फ्रेंडली फोल्डिंग मखरांचे अनेक नवनवीन डिझाइन्स बाजारात आले आहेत. हे मखर वजनाने हलके, वाहतुकीस सोपे व उत्सव झाल्यानंतर घडी घालून ठेवता येणारे आहेत.
कापड बाजार आणि तेली खुंट परिसरात पारंपरिक सजावटीचे कापड, मखमली पडदे आणि पूजा साहित्याची मोठी विक्री होत आहे. तर माळीवाडा व नवी पेठ भागात कागदी मखर, हस्तकलेच्या वस्तू आणि विविध इको-फ्रेंडली आरास साहित्याचे स्टॉल्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चितळे रोड व चौपाटी कारंजा परिसरात विद्युत रोषणाई, कागदी फुलांच्या माळा आणि आधुनिक डिझाइनच्या मखरांची दुकाने थाटलेली आहेत. सावेडीत प्रोफेसर कॉलनी चौक, गुलमोहर रोड व पाईपलाईन रोडवर स्थानिक कारागीर आणि महिला बचतगटांचे इको-फ्रेंडली स्टॉल्स आहेत. पुठ्ठ्याच्या आकर्षक मखर-आसनांच्या किमती ४०० रुपयांपासून ते ४ हजारांपर्यंत आहेत. यात आसनाच्या मागील बाजूस तुळजाभवानी देवी, विठ्ठल मूर्ती, ‘मोरया’ किंवा ‘श्री’ लिहिलेली आसने ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत असल्याचे चितळे रस्त्यावरील विक्रेते रूपम भागवत यांनी सांगितले.
यंदाच्या बाजारपेठेचे असे आहे वेगळेपण मखमली, सिल्क कापड आणि ज्यूटपासून तयार केलेले सुंदर नक्षीकाम असणारे पडदे मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहेत. नारळाच्या झावळ्या, बांबूच्या कामट्या, सुकलेली फुले, ताग आणि लाकडी हस्तकलेच्या वस्तूंपासून बनवलेले शोभेचे प्रकार बाजारात लक्ष वेधून घेत आहेत. तसेच प्लास्टिकच्या कृत्रिम माळांऐवजी हाताने बनवलेली कागदी फुले आणि कापडी गोंड्यांच्या माळांना पसंती दिली जात आहे.