Headlines

डीजे, लेझर लाईट वापरासंदर्भातील निर्बंधांवर काटेकोरपणे अंमल करा:‘आम्ही अमरावतीचे लोक’ तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे‎




येथील लोकशाही-संविधानवादी जनसंघटना समन्वय मंचच्यावतीने बुधवारी ९ सप्टेबरला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करुन डीजे, लेझर लाईट वापराचे निर्बंध काटेकोर पाळण्याची मागणी केली. डॉल्बी-डीजेचा कर्णकर्कश आवाज, लेझर लाईटचा अनिर्बंध वापर सर्वप्रकारच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सभा, मिरवणुका, शोभायात्रा व लग्न समारंभात केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या सीमारेषेचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्यामुळे रुग्ण, वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. डीजेच्या आवाजामुळे हृदय विकाराचा आघात होऊन मृत्यू झाल्याची बरीच उदाहरणे आहेत, तर लेझर लाईटमुळे रेटीना जळून कायमस्वरुपी अंधत्व आल्याचीही उदाहरणे आहेत. चर्चेअंती या बाबी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या. चर्चेदरम्यानच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन करुन योग्य ते निर्देश दिले. निवेदन देतेवेळी बाबा भाकरे, डॉ. प्रकाश मानेकर, प्रा. भाऊ सरकटे, प्रकाश कळसकर, प्रदीप पाटील, नितीन चौधरी, आशिष कडू, धर्मेंद्र भांडारकर, पंकज वैद्य, प्रविण वासनिक, संतोष देशमुख, सुनील घटाळे व इतर सहकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *