Headlines

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार?:अजय बारसकरांची थेट ED कडे तक्रार; आरक्षणाच्या नावाखाली 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप




मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आधीच राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना, आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारसकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात थेट अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’कडे (ED) तक्रार दाखल केली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी वाळू तस्करीसारखे काळे धंदे करून किमान १००० कोटी रुपयांची अवैध संपत्ती जमा केल्याचा अत्यंत गंभीर आरोप बारसकर यांनी केला आहे. यामुळे आगामी काळात मनोज जरांगे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईडी कार्यालयात जाऊन दिले पुरावे अजय बारसकर यांनी स्वतः मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेरून प्रसारमाध्यमांना हीमाहिती दिली. बारसकर यांनी सांगितले की, “मला ईडी कार्यालयाकडून अधिकृत बोलावणे आले होते. त्यानुसार मी स्वतः ईडी कार्यालयात जाऊन डेप्युटी डायरेक्टर (उपसंचालक) यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर माझी सविस्तर बाजू मांडली. माझ्याकडे उपलब्ध असलेले सर्व पुरावे मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहेत.” आरक्षणाच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करून या लोकांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. निकटवर्तीयांच्या नावांची यादीच दिली या प्रकरणात केवळ मनोज जरांगेच नाही, तर त्यांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे बारसकर यांनी म्हटले आहे. त्यांनी ईडीकडे दिलेल्या तक्रारीत पांडुरंग तारक, ईश्वर बलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम पुरणकर, संजय कटारे, स्वप्नील तारक, बद्रीनाथ तारक आणि जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांसारख्या अनेक नावांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. “या सर्व लोकांचा वाळू माफिया हा सर्वात मोठा धंदा आहे. वाळूच्या अवैध धंद्याबाबत आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्याचे सर्वाधिकार ईडीकडे असल्याने, या किमान हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची ईडीने सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,” अशी थेट मागणी बारसकर यांनी केली आहे. ‘डिफेंडर गाड्या आणि लीलावतीचा खर्च कुठून आला?’ मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या राहणीमानावर आणि अचानक वाढलेल्या संपत्तीवर बारसकर यांनी अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “या सर्व लोकांकडे कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी ‘डिफेंडर’ गाड्या कुठून आल्या? मुंबईतील लीलावतीसारख्या अत्यंत महागड्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च कोण करत आहे? हा पैसा कुठून येतो?” असे खडे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. जमिनींच्या खरेदीवरही आक्षेप इतकेच नाही तर, जरांगे यांचे निकटवर्तीय पांडुरंग तारक यांनी नुकतीच ५० एकर आणि २८ एकर जमीन खरेदी केल्याचा दावाही बारसकर यांनी केला आहे. एवढी मोठी जमीन खरेदी करण्यासाठी एकाएकी इतका प्रचंड पैसा या लोकांकडे आला कुठून, याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी या सर्वांच्या संपत्तीची ईडीने तातडीने चौकशी करावी आणि त्यांना चौकशीसाठी बोलावावे, अशी विनंती करण्यासाठीच आपण ईडी कार्यालयात आल्याचे बारसकर यांनी स्पष्ट केले. अजय बारसकर यांच्या या थेट आणि गंभीर आरोपांमुळे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागील घडामोडींवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता ईडी या तक्रारीची दखल घेऊन खरोखरच मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करणार का? आणि या आरोपांवर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस: जशी प्रवृत्ती, तशी माझी भाषा वापरावी लागते, शिंदेंवर बोलावं लागतं याचं मलाही दुःख पण शिरसाटांमुळे बोलावे लागते- मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. सलग 13 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. काल तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *