Headlines

अमरावतीमध्ये लेजर लाईटवर पूर्ण बंदी, ‘डीजे’चा आवाज दाबणार:जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी जारी केले आदेश‎




आगामी सण-उत्सवांच्या विशेषत: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. मुंबई, पुणे, सोलापुर, नागपूर येथे यासंबंधाने काही निर्णयही घेण्यात आले. त्याच धर्तीवर अमरावतीमध्येही तीव्र क्षमतेच्या लेझर व प्लाझ्मा लाईट्सवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून डीजेच्या आवाजावर न्यायालयाच्या निर्देशानुसार डेसिबलची मर्यादा लागू आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे लेजर लाईटस् व डीजेवर बंदी घालण्याबाबतच्या चर्चेने मोठा वेग घेतला होता. दरम्यानच्या काळात काही संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेत त्यांच्याकडे ही मागणी नोंदविली. त्यानुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी पोलिस प्रशासनाला योग्य निर्देश दिले. त्यानुसार सायंकाळी लेझर व प्लाझ्मा लाईटवर बंदी तर डीजेच्या आवाजावर अंकुश घालणारा आदेश जारी करण्यात आला. अमरावती शहर पोलिस प्रशासनाने जारी केलेल्या या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान डोळ्यांना व आरोग्यास धोकादायक ठरणारे लेझर लाईट आणि प्लाझ्मा लाईट वापरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे, तसेच वाद्य वाजवताना केवळ ”दोन बेस व दोन टॉप” लावण्याचीच परवानगी आहे. सदर निर्णयामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे व बेन्जो चालक, मालकांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान सार्वजनिक शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह मानले जात असले, तरी यामुळे प्रभावित होणाऱ्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न कसा सोडवला जातो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. डीजे मर्यादेची अंमलबजावणी आणि लेजर लाईटवर बंदीची मागणी आम्ही अमरावतीकर, एआयएसएफ, आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ, जाणीव फाऊंडेशन, अ.भा. नौजवान सभा आदी संस्था-संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. अमरावती शहर हे विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या शहरातील नागरिकांनी उचललेले पाऊल हे इतर जिल्ह्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. {शांतता क्षेत्र (सर्व रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ आणि न्यायालयांच्या १०० मीटरचा परिसर) – दिवसा (सकाळी ६ ते रात्री १०) ५० डीबी, रात्री ४० डीबी {निवासी क्षेत्र (राजापेठ, रुख्मिणी नगर, दस्तुर नगर, साई नगर, गाडगे नगर, राठी नगर) – दिवसा ५५ डीबी, रात्री ४५ डीबी {व्यवसायिक क्षेत्र (गांधी चौक, जवाहर रोड, सक्करसाथ, श्याम चौक, कॅम्प रोड) – दिवसा ६५ डीबी, रात्री ५५ डीबी {औद्योगिक क्षेत्र (सातुर्णा, नांदगाव पेठ व बडनेरा बायपासवरील एमआयडीसी) – दिवसा ७५ डीबी, रात्री ७० डीबी आरोग्याची सुरक्षा; अंधत्वाचा धोका टळणार तीव्र क्षमतेच्या लेझर लाईट्समुळे डोळ्यांच्या रेटिनाला इजा होणे, काही काळासाठी अंधत्व येणे अशा तक्रारी वाढल्या होत्या. या बंदीमुळे नागरिकांचे आरोग्य व विशेषतः लहान मुले, वृद्ध व रुग्णांच्या डोळ्यांचे रक्षण होईल. ध्वनी प्रदूषणावर बसणार नियंत्रण न्यायालयाच्या नियमांनुसार ठराविक डेसिबल मर्यादेतच आवाज ठेवणे बंधनकारक झाल्यामुळे कानठळ्या बसणाऱ्या आवाजापासून मुक्ती मिळेल व ध्वनी प्रदूषण रोखण्यास मदत होईल. रस्ते अपघाताला ब्रेक; जन सुरक्षा कायम मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझरच्या तीव्र झोतामुळे वाहनचालक दिपून जाऊन अपघात होण्याचा मोठा धोका असतो. यावर बंदी आल्याने सार्वजनिक सुरक्षितता वाढेल. पारंपरिक वाद्यांना नवसंजीवनी डीजे आणि डॉल्बीच्या अतिवापरामुळे ढोल-ताशा पथके, झांज पथक, ब्रास बँडस् व स्थानिक पारंपरिक कलावंतांचे व्यवसाय संकटात आले होते. या निर्णयामुळे आपल्या मूळ संस्कृतीला व पारंपरिक वाद्यवृंदांना पुन्हा प्राधान्य मिळेल. सदर निर्णय जारी करण्यापूर्वी अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून राजापेठ पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालय येथे डीजे आणि बेन्जो चालक, मालक यांची बैठक पार पडली. या बैठकांना पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शाम घुगे, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व डीजे आणि बेन्जो चालक, मालकांनी लेझर व प्लाझ्मा लाईट लावण्यात येऊ नये आणि दोन बेस-दोन टॉपच्या नियमाचे पालन करून सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. या तीव्र लाईट्समुळे होणारे परिणाम अत्यंत घातक आहेत. लेझर बीमचा थेट तीव्र प्रकाश डोळ्यांच्या मज्जातंतूंवर व नेत्रपटलावर पडल्यास ते कायमस्वरूपी जळू शकते, ज्यामुळे व्यक्तीला तात्पुरते किंवा कायमचे अंधत्व येण्याचा मोठा धोका असतो. याशिवाय मिरवणुकीतील गर्दीत अशा फ्लॅश व प्लाझ्मा लाईट्सच्या सततच्या चमकाटा मुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना चक्कर येणे, मळमळणे, तीव्र डोकेदुखी आणि काहींना फेपरे येण्यासारखे गंभीर शारीरिक त्रास होतात. ^डॉल्बी-डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईटचा अनिर्बंध वापर केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या सिमारेषेचे सर्रास उल्लंघन केल्या जाते. त्यामुळे रुग्ण, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना कमालीचा त्रास होतो. -डॉ. प्रकाश मानेकर, आम्ही अमरावतीकर, अमरावती. डीजे चालक, मालकांचे निर्णयाला पाठबळ स्वागतार्ह निर्णय, प्रशासनाचे आभार सकारात्मक निर्णय अमरावतीकरांसाठी लाभदायी ; आरोग्यावरील आघातापासून होणार बचाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *