सोनम वांगचूक यांना जसे उचलण्यात आले होते तसा प्रयत्न सुद्धा सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतीमध्ये करू नये हा महाराष्ट्र आहे इथे हे चालणार नाही हे मला सांगण्याची गरज नाही, मनोज जरांगे पाटील खूप मोठे आहेत त्यांना जर हात लावला तर अख्खा महाराष्ट्र
.
मनोज जरांगे पाटील हे काही स्वत:साठी काही मागत नाही, जनतेसाठी त्यांच्या काय मागण्या आहेत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी आंतरवाली सराटीमध्ये येत ऐकल्या पाहिजेत. जरांगे पाटील हे मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी झटत आहेत, त्यांचे ऐकले नाही तर प्रथमेश देशमुखसारखे आणखी कोणी पाऊल उचलू नये, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिज, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.
जरांगे यांच्यासारख्या समाजसेवकांना वाऱ्यावर सोडणार का?
अभिजीत दिपके म्हणाले की, देशामध्ये आणि राज्यात काय सुरू आहे मला कळत नाही. ज्या लोकांना आपण निवडून दिले आहे ते जनतेना सोडून सर्वांना भेटत आहेत. जे लोकं समाजासाठी लढत आहे, आपल्या जीवाची परवा न करता आमरण उपोषण करत आहे त्यांना भेटायला सरकारकडे वेळ नाही पण काँमेडी करणाऱ्या लोकांना घरी बोलावले जात आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या समाजसेवकाला असेच मरण्यासाठी वाऱ्यावर सोडणार आहात का? असा सवाल दिपके यांनी केला आहे.
सरकार अपयशी ठरल्याने जरांगेंवर उपोषणाची वेळ
अभिजीत दिपके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या काय मागण्या आहेत त्या सरकारने समजून घेतल्या पाहिजे. त्या मागण्या ऐकूण घ्याव्यात. जरांगे पाटील आरक्षण का मागत आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. सरकारने जर मुलांना चांगले शिक्षण आणि रोजगार दिले असते तर जरांगे पाटील यांना उपोषणाला बसावे लागले नसते. सरकार अपयशी ठरल्याने जरांगे पाटील यांना हे पाऊल उचलावे लागले आहे. सरकारवर आता विश्वास उरलेला नाही, आता संविधानाच्या माध्यमातून काहीतरी पर्याय निवडावा लागेल. सरकारने त्यांचे काम केले असते तर जरांगे पाटील यांना उपोषणाला बसावे लागले नसते.
हे ही वृत्त वाचा जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस:‘आता अटीतटीचा सामना, मराठ्यांची लढाई अंतिम टप्प्यात’; जरांगेंचे राज्यभरातील बांधवांना आंतरवालीत येण्याचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा एकही कण न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे.
दरम्यान, आज कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दीपके यांनी सरकारवर तीव्र टीका करत, निर्दयी सरकारने लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. तुम्ही कितीही दिवस बसून राहा, सरकारला काही फरक पडत नाही, असा आरोप केला. वाचा सविस्तर