Headlines

सेनगाव पंचायत समिती गैरव्यवहार प्रकरण:माजी पंचायत समिती सदस्याला अटक, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू




सेनगाव पंचायत समितीच्या कपातीच्या रकमेतील 43 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये सेनगाव पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील मुंदडा याला शुक्रवारी ता. 11 आर्थिक गुन्हे शाखेने सेनगाव येथील आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव पंचायत समितीच्या लेखा विभागामध्ये सर 2018 – 19 ते 2024 -25 या कालावधीमध्ये झालेल्या तपासणीमध्ये कपातीच्या रकमेत सुमारे 43 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये विमा रकमेसह इतर कपातीच्या रकमेचा समावेश होता. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाचे पथकाने केलेल्या तपासणीनंतर हा प्रकार फेब्रूवारी 2025 मध्ये उघड झाला. या संदर्भातील अहवाल जिल्हा परिषदेला दिल्यानंतर तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी तातडीने सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून सेनगाव पोलिसांनी लेखा विभागातील कर्मचारी नितीन शर्मा, नितीन बंडाळे, अनिल गव्हाणकर, दत्तात्रय शिंदे यांच्याविरुद्ध मार्च 2025 मध्येगुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने कपातीच्या रकमेची धनादेश ज्यांच्या खात्यावर वटविण्यात आले त्यांचे जबाब नोंदवली आहेत. याशिवाय काही जणांचे बँक खातेही तपासण्यात आले. यामध्ये सेनगाव पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील मुंदडा यांच्या बँक खात्यात आलेल्या रकमांचा ताळमेळ लक्षात घेता त्यांचा या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आज आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, जमादार अनिल भुक्तर, शेख मदार, संतोष सातव, विलास सोनवणे यांच्या पथकाने सेनगाव येथे जाऊन आज दुपारी माजी पंचायत समिती सदस्य सुनील मुंदडा यास अटक केली आहे. माजी पंचायत समिती सदस्याच्या अटकेनंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये आता आणखी काही जणांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखेने या दृष्टीने तपास चालवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *