Headlines

दुष्काळाच्या सावटात शेळावेत पोळा साजरा:पावसाअभावी बळीराजाच्या डोळ्यात पाणी‎




पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी आणि करपू लागलेल्या पिकांच्या चिंतेतच यंदा शेळावे मंडळातील पोळा सण अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. वर्षभर शेतात घाम गाळणाऱ्या मुक्या जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांचे पूजन तर केले, मात्र पावसाअभावी बळीराजाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पूर्णपणे मावळल्याचे दिसून आले.दरवर्षी शेळावे गावासह संपूर्ण मंडळात पोळ्याच्या दिवशी मोठा उत्साह असतो. मात्र, यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना उलटत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत. विहिरींनी तळ गाठला असून चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे यंदा शेतकऱ्यांनी वाजत-गाजत मिरवणुका न काढता, अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने बैलांना तोरण बांधून सणाची औपचारिकता पूर्ण केली.”बैलांचे पाय धुताना आणि त्यांचे पूजन करताना डोळ्यात पाणी आले. शेतात पीकच उरले नाही तर वर्षभर या जीवापाड जपलेल्या बैलांना खायला काय घालायचे, हा मोठा प्रश्न आहे,” अशी आर्त हाक शेळावे मंडळातील शेतकऱ्यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *