Headlines

हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी:कोणती पूजा आधी करावी, ऋषिपंचमीचे 2 उपवास कसे सोडावे?; जाणून घेऊ पंचांगकर्ते दातेंकडून! VIDEO




यंदा गणेश चतुर्थी व हरितालिका एकाच दिवशी म्हणजे सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी आहे. त्यामुळे भाविकांना कोणती पूजा आधी करावी, कोणती नंतर असा प्रश्न पडला आहे. सोबतच हरितालिकेपाठोपाठ येणाऱ्या ऋषिपंचमीचे दोन उपवास कसे सोडायचे, याची सुद्धा उत्सुकता आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी या बद्दल मार्गदर्शन केले. ते नेमके काय म्हणत आहेत, जाणून घेऊयात या बातमीमधून. परंतु कधीतरी असं होतं… पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, ‘भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी ही अत्यंत आपल्या सगळ्यांना जिव्हाळ्याचा आणि आनंददायी असा सण आहे. परंतु कधीतरी असं होतं, हरितालिका आणि गणपती हे एकाच दिवशी येतात. कधी हरितालिका आणि गणपती एकाच दिवशी आले, तेव्हा आपण आपल्या सोयीने हरितालिकेचे पूजन करून गणपतीची स्थापना ही करू शकतो, किंवा गणपतीची स्थापना झाल्यावर सुद्धा हरतालिकेचं पूजन करू शकतो. कोणतं आधी, कोणतं नंतर… पंचांगकर्ते मोहन दाते पुढे म्हणाले की, ‘कोणतं आधी करावं, कोणतं नंतर करावं असा कुठलाही विषय त्याठिकाणी येत नाही. तेव्हा हरतालिका आणि गणपती एकाच दिवशी आल्यावर आपल्या सोयीप्रमाणे कोणतीही पूजा आधी किंवा नंतर करू शकतो. हरितालिकेच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी आहे. तेव्हा हरितालिकेचा उपवास पुन्हा ऋषिपंचमीचा उपवास असे दोन्ही उपवास लागोपाठ येतात.’ पहिला उपवास कसा सोडायचा? पंचांगकर्ते मोहन दाते पुढे म्हणाले की, ‘पहिला उपवास कसा सोडायचा? तर ऋषिपंचमीच्या दिवशी सकाळी तीर्थ घेऊन किंवा भाताचा, अन्नाचा, भाताचा वास घेऊन आपण हरतालिकेचा उपवास सोडायचा आहे आणि ऋषिपंचमीचा उपवास हा चालू ठेवायचा आहे. तो उपवास आपण त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण तो पूर्ण भोजन घेऊन सोडवायचा असतो.’ उपवासाचे पारणे करून… पंचांगकर्ते मोहन दाते पुढे म्हणाले की, ‘तेव्हा अशाप्रकारे जेव्हा लागोपाठ उपवास येतात, तेव्हा या पद्धतीने आपण त्या उपवासाचे पारणे करून आणि दुसरा उपवास चालू ठेवून आपण हे व्रत करू शकतो.’ यावेळी त्यांनी सर्वांना हरितालिका आणि गणपतीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *