![]()
शताब्दी पूर्ण केलेल्या आणि राज्याच्या ज्ञानसाधनेची खुण असलेल्या न्यायमूर्ती रानडेंच्या जन्मस्थळी श्री माणकेश्वर वाचनालयाची दिमाखदार इमारत उभी राहिली आहे. न्यायाधिष्ठित कायद्याचे राज्य, सामाजिक समता आणि दीन-दुबळ्यांना न्याय, असे उदारमतवादी धोरण न्यायमूर्ती रानडेंनी अंगीकारले होते. ग्रंथालये निर्माण होऊन माणसे वैचारिकदृष्ट्या समृद्ध केली जातात, असे प्रतिपादन गीतकार अरविंद जगताप यांनी केले. येथील १०७ वर्षे पूर्ण केलेल्या श्री माणकेश्वर वाचनालयात आयोजित राज्यस्तरीय स्व. राम उगावकर स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार दिलीप बनकर, साहित्यिक बी. जी. वाघ, वि. दा. व्यवहारे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र डोखळे, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य सागर वैद्य, वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थी कवी अरविंद जगताप यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दिलीप बनकर व सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांच्या हस्ते १० हजार रुपये व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना पुरस्कारार्थी अरविंद जगताप यांनी कलात्मक उंचीचे गाणे लिहिल्यानंतर खूप मोठा आनंद मिळतो, असे सांगितले. आपले कुठल्यातरी जन्माचे किंवा जिव्हाळ्याचे नाते असेल म्हणूनच तुम्ही मला पुरस्कार दिला, असे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या पुरस्कारामुळे साहित्य आणि गीतलेखन क्षेत्रातील योगदानाला नवी प्रेरणा मिळाली.
Source link
पुरस्कार सोहळा:ग्रंथालयांमुळे वैचारिक समृद्धता, माणकेश्वर वाचनालयात जगताप यांचे प्रतिपादन