Headlines

कोणार्क कॉलनीत रानडुकराचा वावर:रहिवाशांमध्ये भीती, उपाययोजना करण्याची मागणी‎




शहरातील कोणार्क कॉलनी (कठोरा नाका) परिसरात रानडुकराचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुक्कर थेट नागरी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रानडुकराच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असल्याने त्याच भागात रानडुक्कर वावरत असल्याने मनपा व वन प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. कोणार्क कॉलनी येथील रहिवासी असलेले श्रीनाथ वानखडे यांना दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर पहाटे सव्वा वाजता कुत्रांच्या भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे कुतहलापोटी ते काही वेळासाठी घराबाहेर आले. पुढे जे दृश्य दिसले ते भयावह होते. भल्यामोठ्या रानडुकराच्या मागे १५ ते २० कुत्रे मोठ्या-मोठ्याने भुंकत होते. दरम्यान गेल्या एक आठवड्यापासून दररोज मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिका व वन प्रशासनाने वेळीच जागे होऊन त्या रानडुकराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे आली आहे. दोन महिन्यांपूर्वी २४ जून रोजी नजीकच्या आशियाड कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने हल्ला केला होता. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यात गोविंद पिंजरकर यांचा मृत्यू झाला. याच कालावधीत कॉटन ग्रीन कॉलनीत महिलेच्या अंगावर धावल्याची घटना घडली. १ बळी, अशी आहे हल्ल्यांची श्रृंखला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *