![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या ‘मुंबई चलो’ आंदोलनावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. जरांगेंची मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागून मुंबईत येणार नाही असे जाहीर करावे, अशी थेट मागणी सदावर्ते यांनी केली आहे. ‘दोन जन्म घेतले तरी मागणी मान्य होणार नाही’ मनोज जरांगे यांच्या उपोषणावर आणि त्यांच्या मागण्यांवर कडाडून टीका करताना सदावर्ते म्हणाले की, “मनोज जरांगे यांचे दोन जन्म जरी झाले, तरीसुद्धा त्यांची ही मागणी कुणीच मान्य करू शकत नाही. जरांगेंच्या मागण्या पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी या आंदोलनावर ताशेरे ओढले आहेत. ‘मुंबईच्या वेशीवर कायदेशीर तटबंदी करणार’ जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी आपण कायदेशीर लढा देणार असल्याचे सदावर्ते यांनी स्पष्ट केले. “आम्ही कायदेशीररित्या मुंबईच्या वेशीवर तटबंदी करणार आहोत. या मुंबईला डिस्टर्ब करून, कुणालाही मुख्यमंत्री बदलू दिले जाणार नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला आहे. जरांगे पाटील हे बेकायदेशीरपणे मुंबईत येऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. ‘जरांगे हा मराठा पुढाऱ्यांचा हँडल’ जरांगे यांच्या पाठीशी राजकीय नेत्यांचा हात असल्याचा आरोप करत सदावर्ते म्हणाले की, “मनोज जरांगे हा सर्वपक्षीय मराठा पुढाऱ्यांचा हँडल आहे.” या राजकीय पाठबळामुळेच ते हे आंदोलन करत असल्याचा दावा त्यांनी केला. “हे तुझा उपद्रव बंद कर, महाराष्ट्राची माफी माग आणि मुंबईत येणार नाही म्हणून जाहीर कर,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना सुनावले आहे. ————- हेही वाचा.. मनोज जरांगेंचा एल्गार, 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करणार:पाटोदा-खोपोलीमार्गे थेट आझाद मैदानात आमरण उपोषण; मार्ग जाहीर करताना जरांगे भावुक मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि सगेसोयरे तसेच कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. आपल्या आमरण उपोषणाच्या 15व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी मुंबईला जाण्याचा सविस्तर मार्ग, मुक्काम आणि आंदोलनाची संपूर्ण रणनीती जाहीर केली. “ही मराठ्यांची अंतिम आणि निर्णायक लढाई असून, आपण शांततेच्या मार्गाने मुंबईत जाऊन जिंकूनच माघारी येणार आहोत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा
Source link
कायदेशीररित्या मुंबईच्या वेशीवर तटबंदी करणार!:सदावर्तेंचा इशारा, म्हणाले- जरांगेंनी दोन जन्म घेतले तरी मागणी मान्य होणार नाही