Headlines

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अमरावतीनंतर चांदूर रेल्वेत धक्का:प्रशांत शिरभाते, दिनेश आमले क्रांतिकारी शेतकरी संघटनेत दाखल, मिळाली नवी पदे




माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अमरावतीनंतर आता चांदूर रेल्वेतही धक्का बसला आहे. प्रशांत शिरभाते आणि दिनेश आमले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून क्रांतिकारी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या प्रवेशानंतर प्रशांत शिरभाते यांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. तर दिनेश आमले यांची चांदूर रेल्वे तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी दोघांनाही नियुक्तीपत्रे देऊन नवीन जबाबदारी दिली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्कप्रमुख अमित अढाऊ यांच्या शिफारशीवरून ही निवड झाल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठवणे, संघटनेची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, तसेच संघटनेची जिल्ह्यातील ताकद वाढवणे हे आव्हान या दोघांसमोर आहे. यावेळी शेतकरी प्रश्न, शेतीशी संबंधित समस्या आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी संघटनेच्या माध्यमातून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रवेशावेळी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर, मुख्य समन्वयक महाराष्ट्र सचिन पांडुळे, प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, संपर्कप्रमुख अमित अढाऊ यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *