![]()
जालना शहरात ६० वर्षीय संशयिताने६ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्नकेला. या प्रकरणात सदर बाजारपोलिसांनी संशयिताला जेरबंद केले.त्याच्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांनी केली.दिनेश काशीनाथ सुवर्णकार (टेलर)असे संशयिताचे नाव आहे. संतप्तजमावाने संशयिताच्या घराचीतोडफोड केली. त्याच्या घरावरीलपत्रे काढून फेकली. या घटनेनंतर मोठ्या संख्येने जमावसदर बाजार पोलिस ठाण्यात आलाहोता. जमावाने ठिय्या आंदोलनकेले. माजी आमदार कैलासगोरंट्याल हेदेखील ठाण्यात आले .संशयिताला आमच्या ताब्यात द्या,अशी मागणी केली. परंतु पोलिसांनीमध्यस्थी करत समजूत काढल्यावरजमाव शांत झाला. संशयिताची पत्नी, मुलगा दोघेही पोलिस ठाण्यात आले जमाव संतप्त झाल्याने संशयिताचे कुटुंबही सदर बाजार ठाण्यात आले. पतीनेहे कृत्य कसे काय केले, आरोप तर होत नाही ना, असे म्हणत संशयिताची पत्नीव मुलगा ठाण्यात येऊन ढसाढसा रडत होते. ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दीझाल्याने पोलिसांनी संशयिताला पत्नी, मुलासह सुरक्षीत ठिकाणी ठेवले.
Source link
जालन्यात मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न;संशयिताच्या घरी जमावाकडून तोडफोड:कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांचा सदर बाजार पोलिस ठाण्यामध्ये ठिय्या