![]()
लाडक्या गणरायाच्या स्वागताला लहान थोरांसह सर्वच जण आतुर झाले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासह घरगुती गणपतीच्या आगमणाची तयारी करण्यात आली. जिल्ह्यात ३२४६ गणेश मंडळांकडून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात २५८ गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवण्यात येणार आहे. गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी गणेश मंडळांनी केली आहे. पारंपरिक वाद्याच्या गजरात मंडळांकडून स्वागत करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रमांवर भर द्यावा, असे आवाहन सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. जे मंडळ किमान १ हजार वृक्ष लागवड करेल, त्या मंडळाच्या श्रींच्या आरतीसाठी मी स्वतः हजेरी लावणार, अशी असेही दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. उत्साही वातावरणात १२ दिवस उत्सव साजरा होणार आहे. (छाया : भारत मगर, अकलूज ) गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात आलेल्या भक्तांकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदीकडे कल दिसून आला. मातीच्या गणेशमूर्तींना भक्तांनी पसंदी दिली. विविध आकाराच्या आणि वेशभूषेतील गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध होत्या. बच्चे कंपनी गणेश मूर्तींची निवड करण्यात अग्रेसर असल्याचे दिसले. ^यंदा ग्रामीण भागात साधारणपणे ३,२४६ हून अधिक मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना होईल. ज्यामध्ये २५८ गावांत “एक गाव एक गणपती’ संकल्पना असेल. यंदाच्या वर्षी डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याचे नियोजन आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील सुमारे १० ते १२ प्रमुख मंडळांनी १ हजार झाडे लावण्याचे नियोजन सुरू केले अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक
Source link
श्रींचे आगमन:जिल्ह्यात 3246 मंडळांकडून श्रींच्या स्वागताची तयारी, 258 गावांत "एकमुखी'' आवाज गणपती बाप्पा मोरया!