Headlines

अरुण लाडांनी दिलेला शब्द पाळावा:पुणे पदवीधरसाठी मानेच योग्य उमेदवार, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 'गोकुळ'चे पॅनेल ठरणार- मुश्रीफ




गोकुळ दूध संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच मोठा भाऊ आहे. आगामी निवडणूक आम्ही महायुती म्हणून एकत्र लढवणार आणि जिंकणार आहोत, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. गोकुळच्या दूध उत्पादक संस्थांवर काही ‘अदृश्य शक्तीं’नी विनाकारण आक्षेप घेतला होता. मात्र, आम्ही या संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. सर्किट बेंच असो की सर्वोच्च न्यायालय, आम्ही संस्थांना कायदेशीर मदत केली आहे. हे संस्थाध्यक्षांनाही ठाऊक आहे. असे असताना आता निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी आमदार सतेज पाटील न्यायालयात मदत केल्याचा दावा करत आहेत; त्यांनी असे सहानुभूतीचे राजकारण करू नये, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, गोकुळचे दूध संकलन वाढवण्यासाठीच नवीन संस्था वाढवण्यात आल्या, ज्यामुळे संकलन 9 लाख लिटरवरून 20 लाख लिटरवर पोहोचले. वाढीव संस्थांपैकी काही मोजक्या संस्था सोडल्या तर बहुतांश संस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या म्हणजेच महायुतीच्या कार्यकर्त्यांच्याच आहेत. मग त्यांना मतदार यादीतून वगळण्याचा खटाटोप का केला गेला? एकनाथ शिंदे झाल्यानंतर आणि अतुल सावे सहकारमंत्री असताना राज्यात 308 दिवस आमचे सरकार होते; मग या काळात अदृश्य शक्तींनी स्वतःच्या संस्था का वाढवल्या नाहीत? असा सवालही त्यांनी केला. महायुतीचे साडेतीन हजार सभासद मंत्री मुश्रीफ म्हणाले की, गोकुळसाठी मतदान करणारे एकूण 5 हजार 380 सभासद आहेत. त्यातील काँग्रेसचे सभासद सोडले, तर सुमारे 3 हजार 500 सभासद हे राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीचे पॅनेल बनवणार आहोत. यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे बैठकीनंतर स्पष्ट होईल. अडानींच्या सल्ल्याने मोहिमेचा चुथडा मंत्री मुश्रीफ म्हणाले की, विकृत, अडाणी आणि विनाशकारी प्रवृत्तीच्या लोकांचा सल्ला घेतल्यास धूळदाण अटळ असते. अशा अर्धवट ज्ञान असणाऱ्यांचे ऐकूनच अदृश्य शक्तीने संस्थांना न्यायालयात खेचले. मी पहिल्यापासूनच संस्थांच्या पाठीशी होतो. अर्धवट ज्ञान असणाऱ्याचे मार्गदर्शन घेतल्यावर मोहिमेचा कसा चुथडा होतो, याची प्रचिती या अदृश्य शक्तीला आणि संपूर्ण जिल्ह्याला आली आहे, असा खोचक टोला त्यांनी प्रकाश बेलवाडे यांचे नाव न घेता लगावला. पुणे पदवीधर मतदारसंघावरून लाडांना शब्दाची आठवण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, गेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी अरुण लाड यांनी प्रताप माने यांना ‘मी एकदा लढतो, पुढच्या वेळी तुम्ही लढा’ असा शब्द आमच्यासमोर दिला होता. आता त्यांनी तो शब्द पाळायला हवा आणि त्यांचे सुपुत्र शरद लाड यांची समजूत काढायला हवी. या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे निश्चित असल्यानेच शरद लाड यांनी भाजपचा रस्ता धरला. आगामी निवडणुकीत भाजपने ही जागा मागितली तरी आम्ही त्यांची समजूत काढू. कारण प्रताप माने यांचे शिक्षण क्षेत्रातील काम प्रभावी असून ‘जेन-झी’ पिढीचे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. गेल्या वेळी अरुण लाड यांच्या आग्रहाखातर माने यांनी माघार घेतली होती. हे ही वृत्त वाचा समोरचा हिंदू नसेल तर सामान घेऊ नका:आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित, मगच इतर, हिंदूंना त्रास दिल्यास तांडव करू- नीतेश राणे
समोरचा व्यक्ती जर हिंदू असतील तरच त्यांच्याकडून सामान घेतले पाहिजे. समोरचा व्यक्ती जर हिंदू नसेल टीका लावत नसेल, त्याला हनुमान चालीसा किंवा गणपती बाप्पांची आरती आली पाहिजे तरच मी त्यांच्याकडून वस्तू विकत घेईल ही भूमिका प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे, असे भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारमध्ये पहिले हिंदूंचे हित पाहिले जाणार मग सर्वांना मोजणार हे आमच्या डोक्यात स्पष्ट आहे. कोणीही वळवळ करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *