![]()
बीड तालुक्यातील १४ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणात पोलिसांच्या तपासात नवा खुलासा झाला. प्रेम प्रकरणातून आधीच पळून गेलेल्या मुलीचा शोध घेऊन तिला पुन्हा त्याच मुलाशी २ लाख रुपयांचा सौदा करून विवाह लावून दिला गेला. मात्र, मुलाने २० हजार रुपये देऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. आई-वडिलांनी बालविवाह केल्याची बाब लपवून ठेवली. मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केला. अखेर, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या एपीआय जनाबाई सांगळे व पथकाने मुलीचा कोल्हापुरात शोध घेतला. मुलाला अटक केली. १४ वर्षीय मुलगी काही महिन्यांपूर्वी गावातीलच एका मुलासोबत प्रेमप्रकरणातून पळून गेली होती. नातेवाइकांनी मुलीचा शोध घेऊन तिला परत आणले. त्यानंतर मुलगा व मुलगी या दोन्ही बाजूंच्या कुटुंबाची बैठक झाली. मुलाकडून २ लाख रुपये घेऊन मुलीचे त्याच्याशी लग्न लावून देण्याचे ठरले.त्यानुसार लग्न लावले. मात्र, मुलाने रोख १० हजार, ऑनलाइन १० हजार असे केवळ २० हजार रुपयेच सुरुवातीला दिले होते. भीतीपोटी लग्नानंतर पळ लग्न झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबाने पैशांसाठी तगादा लावला. कुणीतरी बालविवाहाची तक्रार देऊ असेही म्हटले. मुलगी पुन्हा आपल्यापासून दूर जाईल. या भीतीपोटी एका दिवशी मुलगा व मुलगी दोघेही गाव सोडून निघून गेले. या प्रकरणात आता बालविवाह वबाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याचेकलम वाढणार आहे. शिवाय मुलीचे वमुलाचे आई-वडील यांनाही आरोपी केले. एएचटीयूने लावला छडा हा गुन्हा महिनाभरापूर्वी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे तपासासाठी आला. एपीआय जनाबाई सांगळे यांच्या पथकाने तपास करून मुलगी कोल्हापूरमध्ये असल्याचा शोध लावला. एएसआय उषा चौरे, हवालदार प्रदीप येवले,अशोक शिंदे, भाऊसाहेब कारले यांनी कोल्हापूरला जाऊन मुलीची सुटका केली. मुलाला ताब्यात घेतले. अपहरणाची दिली
होती खोटी तक्रार पैसे न देताच मुलगा मुलीला घेऊन गाव सोडून गेल्याने मुलीच्या आई-वडिलांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी नेकनूर पोलिस ठाण्यात मुलीचे अज्ञाताकडून अपहरण झाल्याची तक्रार दिली. मुलीचा शोध घ्या म्हणत पोलिसांकडे चकरा मारल्या. आंदोलनही केले. मुलीला नेकनूर येथे आणल्यानंतर तिचा जबाब नोंदवला गेला. या जबाबामुळे बालविवाह झाल्याचे व २ लाखांत सौदा झाल्याचा भंडाफोड झाला.
Source link
अपहरणाच्या गुन्ह्याला वेगळे वळण:2 लाखांत सौदा, मुलीचा बालविवाह; पैसेन मिळाल्याने नोंदवला अपहरणाचा गुन्हा, मुलीच्या शोधासाठी आंदोलनही केले होते पालकांनी