![]()
अकोला गीतानगर सखी मंडळाच्या वतीने श्री रामदेवबाबा- श्यामबाबा मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्सव संपन्न झाला. या उत्सवात चंदना लटुरिया यांनी नंदबाबा व नेहा साहू यांनी यशोदा मैय्या यांची भूमिका साकारली. बालकृष्णाच्या रूपात साकारलेल्या कियारा गुप्ता यांचे सर्व सख्यांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. सर्वात प्रथम सरला शर्मा व सरिता शर्मा यांनी सर्व सख्यांचे टिळा व पुष्पवर्षा करून स्वागत केले. अर्चना अग्रवाल व सरला गाडोदिया यांनी सहकार्य केले. वैशाली सोनी, चंदना लटूरिया व रूपा अग्रवाल यांनी सर्व सख्यांना टेबल गेम खेळवले. मुलांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा दोन श्रेणींमध्ये घेण्यात आली. “पगडी सजाओ’ स्पर्धेत सर्व सख्यांनी उत्साहाने भाग घेतला. कार्यक्रमात आलेल्या सर्व मुलांना प्रीती सराफ व शीतल गांधी यांनी खेळ खेळवले. परीक्षक म्हणून अर्चना रांदड यांनी काम पाहिले. वैशाली सोनी, चंचल शर्मा, तृप्ती अग्रवाल व दीप्ती लड्ढा यांनी श्रीकृष्णाच्या रासगीतांवर सादरीकरण केले. या उत्सवातील स्पर्धेच्या टेबल गेममध्ये वैशाली सोनी, मालानी, सारिका जोशी, पगडी सजाओ स्पर्धेत प्रथम चंचल शर्मा, द्वितीय रूपा अग्रवाल, तृतीय नेहा साहू, फॅन्सी ड्रेस (५-१० वयोगट) प्रथम लावण्या व अथर्व पनपालिया, द्वितीय आर्ना तिवारी, तृतीय धारा राठी, फॅन्सी ड्रेस १०- १५ वयोगटात प्रथम प्राजंली गुप्ता, द्वितीय इशिका गांधी, प्रोत्साहन पुरस्कार चार्वी शर्मा, रिद्धिमा शर्मा, मितांशू गुप्ता विजेता ठरल्या. सूत्रसंचालन नेहा साहू व दीप्ती लड्ढा यांनी केले. खेळात प्रथम प्राजंली गुप्ता, द्वितीय राव्या भुतडा, तृतीय रिद्धिमा शर्मा, हाऊसी जन्माष्टमी थीम, ममता व्यास, किरण जाजू, कनक बाहेती, सुनयना डागा, सरला शर्मा, जिया राठी, श्वेता गांधी, मंजू गट्टानी, रानी अग्रवाल, चेतना शर्मा, गुनगुन अग्रवाल, लावण्या पनपालिया, मोनल राठी, प्रीति सराफ, अश्विनी पनपालिया आदी सहभागी झाल्या. गीतानगर सखी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
Source link
गीतानगर सखी मंडळाने साजरा केला श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव:"नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल''चा झाला जल्लोष