Headlines

नरखेडमध्ये 417 नागरिकांना मिळाले दाखले:तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीत विविध दाखल्यांचे वाटप‎




मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. नरखेड मंडळातील नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात १५ हून अधिक महसुली सेवांचे थेट लाभ देण्यात आले. यामध्ये एकूण ४१७ लाभार्थ्यांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेतली. सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धेश्वर अन्नक्षेत्र मंडळाच्या सभामंडपामध्ये हे शिबिर पार पडले. शिबिराच्या सुरुवातीला तहसीलदार सचिन मुळीक व जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारात नेण्याच्या उद्देशाने या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तहसीलदार सचिन मुळीक, जि.प. सदस्य लखन शिंदे यांच्यासह राजकुमार पाटील, विनोद पाटील, गुरु तागडे व इतर सहकारी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून प्रलंबित दाखले मिळाल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिराचा अनेक गरजूंना लाभ झाला. तहसील कार्यालय, सेतूमध्ये फेऱ्या मारण्याऐवजी गावातच दाखले मिळाल्याने नागरिकांनी विविध दाखले काढून घेतले. यावेळी लाभार्थी उपस्थित होते. एकाच ठिकाणी तालुक्यातील गरजवंतांना मिळाले विविध दाखले या शिबिरामध्ये दिवसभरातविविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ (७५) आणि ८-अ उताऱ्यांचे (५२) वाटप. उत्पन्नाचे दाखले (८८), फेरफार वाटप (४८) आणि प्रलंबित नोंदी निर्गत (१९). पीएम किसान माहिती (६८), संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना प्रकरणे (२२). शिधापत्रिका दुरुस्ती/नाव वाढवणे-कमी करणे (१५), जन्म दाखला चौकशी (५), बिनशेती अर्ज स्वीकृती (२) आणि ऍग्री स्टॅक (२३). इतके दाखले वाटप केले. प्रशासकीय यंत्रणेचे ‘मिशन समाधान’ हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष कष्ट घेतले. यामध्ये मंडळ अधिकारी किसन दळवे, ग्रामपंचायत अधिकारी तात्यासाहेब नाईकनवरे, पुरवठा शाखेचे मितारे, संजय गांधी शाखेच्या नवले, तलाठी विलास मोटे यांच्यासह महसूलचे कर्मचारी उपस्थित होते. नरखेडमध्ये समाधान शिबिरात दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी लाभार्थी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *