Headlines

मनोज जरांगे कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहेत:जरांगेंची भाषा शिवरायांच्या संस्कृतीला न शोभणारी; आशिष जयस्वाल यांचा हल्लाबोल




छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला न शोभणाऱ्या भाषेत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून एकेरी शब्दांत जी टिंगल करत आहे ती कोणाच्या तरी इशाऱ्यावर हे करत आहेत हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला माहिती आहे, असे शिवसेना नेते तथा मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे. आशिष जयस्वाल म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मनात काय द्वेष आहे मला कळत नाही. परंतु सातत्याने ज्या सरकारने मराठा समाजाला न्याय दिला, ज्या लोकांनी मराठा समाजाला सोयी-सुविधांपासून वंचित ठेवले अशा लोकांच्या सांगण्यावर ज्या लोकांनी मराठा समाजाला न्याय दिला अशा सरकारविरोधात भ्रम, अराजकता निर्माण केली जात आहे. केवळ फडणवीस, शिंदेंविरोधात भ्रम तयार करण्याचा प्रयत्न आशिष जयस्वाल म्हणाले की, जात पडताळणीसाठी जी व्यवस्था आहे त्याला काही त्यांनी चुकीचं केलं असेल तर तुम्हाला न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आहे परंतु अशा पद्धतीनं अराजकतेचं वातावरण देशात आणि महाराष्ट्रात निर्माण करणे योग्य नाही. ते कोणाच्या तरी सांगण्यावर करत आहे हे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याविरोधात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांनी जरांगे पाटलांना एक्स्पोज करावं आशिष जयस्वाल म्हणाले की, मनोज जरांगे यांना राज्यातील इतर लोकांनी उघडे पाडलं पाहिजे. व्यवस्थेच्या विरोधात अराजकता निर्माण करणे योग्य नाही. जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. पण समजनेवालो को इशारा काफी है असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महायुतीने शेतकऱ्यांना मोठे पॅकेज दिले आशिष जयस्वाल म्हणाले की, अतिवृष्टी झाली त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना मोठे पॅकेज दिले होते. जवळपास ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्यम जमा करण्यात आली होती. आताही सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. जे संकट निर्माण झाले आहे त्यासाठी प्रत्येक जिल्हयात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आम्ही कधीच वाऱ्यावर सोडले नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात महायुती सरकारने शेतकऱ्यांना जी मदत केली ती मदत एक विक्रम आहे. सरकारसमोर आर्थिक संकट येतच असते पण शेतकऱ्यांसाठी आम्ही कधीही अडचणी सांगत नाही आणि मदत करतो. रोहित पवार चर्चेत राहण्यासाठी बोलतात आशिष जयस्वाल म्हणाले की, रोहित पवार केवळ स्वत:चे नाव चर्चेत रहावे म्हणून काही तरी प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. तर दिशा सालियान प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी काही भाष्य केले तर ते योग्य ठरेल. तर गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंवर अनेक वेळा टीका करतात पण ते ज्येष्ठ असल्याने आजपर्यंत एकनाथ शिंदेंकडून त्यांच्यावर एकदाही टीका करण्यात आली नाही, पण त्यांना समज दिली गेली पाहिजे. हे ही वृत्त वाचा

जळगावात चिमुकल्यासह विवाहितेची ‎गळफास घेऊन आत्महत्या‎:आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, दशरथनगर परिसरातील घटना
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, जळगाव शहरातील दशरथनगर परिसरातील तळेले कॉलनीत एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय विवाहितेने आपल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काल सायंकाळी उघडकीस आली असून, हेमांगी निखिल महाजन आणि शौर्य महाजन अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *