Headlines

Disha Salian FIR Not Political Conspiracy; Navnath Ban Statement


महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसांचाच आहे, अमित शहा म्हणाले की इथे बहुभाषिक माणसं राहतात, यामध्ये काही चूक आहे का? दिल्लीतसुद्धा बहुभाषिक लोकं राहतात. मुंबईवर मराठी माणसांचा हक्क आहे हे अमित शहा आणि जनतेला सुद्धा

.

नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरे यांनी आज जी X वर पोस्ट केली आहे ती अमित ठाकरेसाठी केली असावी. शासकीय कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला तरी सुद्धा पंतप्रधानांची प्रतिमा कमी होत नाही कारण 140 कोटी लोकं त्यांच्यापाठीशी आहेत हा सल्ला राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना घरी दिलाच होता पण आता पोस्ट करत सुद्धा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो यापुढे काढू नका आणि त्यांच्या नादी लागू नका असेच त्यांनी अमित ठाकरेंनी सूचवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यात फोटो काढल्यानंतर राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना माध्यमांसमोर येऊच दिले नाही.

नवनाथ बन म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो तिचे वडील कोर्टात गेले होते कोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय षड्यंत्र कुठे आहे? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला असे संजय राऊत सांगतात आणि दुसरीकडे यामध्ये राजकीय षड्यंत्र आहे असेही म्हणतात. जर यामध्ये कोणी दोषी नसेल तर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याला घाबरण्याची काही गरज नाही. केवळ त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या.

नवनाथ बन म्हणाले की, ठाकरे कुटुंबाचे स्थान डळमळीत करण्याचे काम संजय राऊत यांनी केला आहे, सरकारकडून असे कोणताही प्रयत्न केला जात नाही. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून तुम्ही ठाकरे कुटुंबियांच्या वैचारिक वारशाला डाग लावला आहे. तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आदर्श मानत आहात तिथेच तुम्ही ठाकरेंच्या वैचारिक वारशाला डाग लावत आहात. सरकारचा काही हेतू किंवा प्रयत्न नाही तुम्हाला बदनाम करण्यासाठी सरकारने हा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. हा गुन्हा सीबीआयने कोर्टाच्या सांगण्यावर केला आहे. यात जर तुम्ही दोषी नसाल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. सीबीआयच्या तपासात खरे काय आहे ते समोर येईल.

3 खासदारांच्या जीवावर काय डीलिमिटेशन होणार?

नवनाथ बन म्हणाले की, उबाठाचे 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. आता तुमच्याकडे उरले 3 खासदार त्यांनी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिल्यावर किती खासदार वाढणार आहे? असा सवाल बन यांनी केला आहे. तीन खासदारांच्या जीवावर काय डीलिमिटेशन होणार? तुमच्याकडे काही 100 खासदार नाही की तुमच्यावर दबाव आणत बिल मंजूर करायला लावायचे. डीलिमिटेशनसाठी उबाठाच्या तीन खासदारांची गरज नाही; मोदी-शहांच्या नेतृत्वावर भाजपाचा विश्वास आहे.

हे ही वृत्त वाचा संजय राऊतांचा सरकारवर घणाघात:म्हणाले- दिशा सालियानची फाईल ओपन करणं, हा तर जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्याचा डाव

दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच महाराष्ट्राबाबत केलेले विधान, या तिन्ही मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणाचा तपास आणि बातम्या या पूर्णपणे ‘मॅनेज’ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.