Headlines

बार्शीच्या 38 धावपटूंकडून 21 किमीची हिल मॅरेथॉन पूर्ण‎:उल्लेखनीय कामगिरीबद्दल धावपटूंचा बार्शी रनर्स व बार्शी सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आला सत्कार‎



सातारा हिल मॅरेथॉनमध्ये बार्शी रनर्सच्या ३८ धावपटूंनी सहभाग नोंदवत २१ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बार्शी रनर्स व बार्शी सायकलिंग क्लबच्या वतीने येथील शिवशक्ती मैदान येथे सर्व धावपटूंचा सत्कार करण्यात आल

.

या प्रसंगी १००० किलोमीटर बीआरएम सायकलिंग अवघ्या ७३ तासांत पूर्ण केल्याबद्दल सायकलिस्ट नीलेश सरवदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सातारा हिल मॅरेथॉन २१ किमी अंतर दोन तासांच्या आत, १ तास ५८ मिनिटांत पूर्ण केल्याबद्दल युवराज करळे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सत्कार समारंभास नागपूरचे उपजिल्हाधिकारी उमेश चव्हाण, जयकुमार शितोळे, फौजदार आबासाहेब शिरगिरे, कुलदीप सोनटक्के, प्रमोद देशमुख तसेच बार्शी सायकलिंग क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत बारबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व ३८ धावपटूंचा सत्कार करण्यात आला.

युवराज करळे, शिवराज कात्रे, नीलेश खळदकर, अमोल ताकभाते, अमृत खेडकर, डॉ. विजय पवार, महावीर कदम, प्रकाश फुरडे, प्रशांत चाकवते, विजय क्षीरसागर,करण पाटील, रमेश मोरे, गणेश माने, अमोल बनसोडे, संभाजी नवले, संतोष घावटे, डॉ. प्रवीण मिरगणे, रणजित पाटील, प्रकाश माळी, पार्थ सापनाईकर, बंडू भोरे, राहुल गुंडेवार, माणिक हजारे, डॉ. कुमार जगताप, श्रीकांत नान्नजकर, श्रेयस परदेशी, प्रतीक गव्हाणे, सचिन थोरबोले, अजित देशमुख, डॉ. नवदीप लोकरे, वासुदेव ढगे, सुजीत करपे, सतीश कोळी, विनोद बुडुख, रवी बजाज, डॉ. अतुल कुंभारे, उमेश कोल्हे, सुरज लोळगे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *