Headlines

नाशिकला ‘दारू का प्यायला’ विचारताच मुलाने आईस मारले:धारदार शस्त्राने वार केल्याने वृद्धा जागीच ठार




दारू पिऊन आल्याचा जाब विचारल्याच्या रागातून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी गंगापूरमधील शिवाजीनगर येथे घडली. कमलाबाई अनाजी वळवी (७०) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी संशयित मुलगा तानाजी वळवी (४०) याला ताब्यात घेतले आहे. तानाजीला दारूचे व्यसन आहे. रात्री तो नशेत घरी आल्यावर आईने जाब विचारल्याने दोघांत भांडण झाले. संतापात तानाजीने आईवर चाकूने वार केले. अतिरक्तस्रावामुळे कमलाबाईंचा जागीच मृत्यू झाला. रात्री आरडाओरड ऐकूनही रोजचीच भांडणे समजून शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सकाळी कमलाबाई बाहेर न आल्याने नागरिकांनी घरी जाऊन पाहिले असता खून उघडकीस आला. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तानाजीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीत त्याने आईचा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *