Headlines

शालार्थ आयडीप्रकरणी संभाजीनगरातील 742 शाळांच्या कागदपत्रांची तपासणी:खासगी शाळांना 16 ते 18 सप्टेंबरला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश




जिल्ह्यातील ७४२ शाळांनी विशेष चौकशी पथकासाठी (एसआयटी) १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान शिक्षकांच्या मान्यता आणि सेवासातत्याची सर्व कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी शाळांचे अध्यक्ष, सचिवांसह मुख्याध्यापकांना बजावले आहेत. पदमपुरा येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कागदपत्रे कारण न देता जमा करावी लागणार आहेत. गत आठवड्यात एसआयटीने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीसंदर्भातील १० हजार ४९ संचिकांची तपासणी केली होती. आता हे पथक पुन्हा २०१६ ते २०१९ या कालावधीत रुजू झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी येणार आहे. निर्धारित वेळेत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांवर निश्चित केली जाईल, दिरंगाई करू नये, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. कागदपत्रांचे प्रस्तावासाठी नियम आणि वेळापत्रक कागदपत्रांचे प्रस्ताव सादर करताना प्रत्येक पानावर व्यवस्थापन व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व पृष्ठ क्रमांक बंधनकारक आहे. प्रस्तावात मागासवर्ग कक्षाकडून प्रमाणित जाहिरात व बिंदुनामावली जोडणे, यादीतील अनुक्रमांक १ ते २०० या शिक्षकांची कागदपत्रे १६ सप्टेंबर, २०१ ते ४०० क्रमांकांची १७ सप्टेंबर, ४०१ ते ७४२ क्रमांकांची कागदपत्रे १८ सप्टेंबरला तपासणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *