![]()
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ ग्रामपंचायत अंतर्गत टोकरशेत येथे जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून उन्हाळ्यात दुरुस्ती केलेला पाझर तलाव पहिल्याच पावसात पाझरू लागला आहे. मुख्य बांधातून अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने लाखो
.
येथील गरीच्या अवानात लघु पाटबंधारे विभागाने पाझर तलावाची दुरुस्ती केली. मात्र, दुरुस्तीचे काम अपूर्ण अवस्थेत असतानाच ते हाती घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. पहिल्याच पावसात तलावातून पाणी झिरपू लागल्याने बांधाला धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती गंभीर होत असताना ग्रामस्थांनाच बांधावर भराव टाकण्याची वेळ आली. पाझर तलावाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीवर महिला भीतीच्या सावटाखाली पाणी भरत आहेत. तलावातून होणाऱ्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असून, सुरक्षितताही धोक्यात आली आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या कामाचा दर्जा आणि खर्च याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दगड-मातीने मलमपट्टी पाझरतलावाच्या दुरुस्तीसाठी माळरानावरील दगड-गोटे तसेच मातीचा वापर करण्यात आला आहे. काही ठिकाणी जुन्या बांधावरील माती काढून त्यावरच कामाची मलमपट्टी करण्यात आली आहे. मुख्य बांधातून अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे.
कामावर ३० लाख रुपयांचा खर्च ^ तलावाचे अपूर्ण असलेले काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केले आहे. ५० लाख रुपयांच्या कामामध्ये ३० लाख रुपये कामासाठी वापरण्यात आले असून, उर्वरित २० लाख रुपये रॉयल्टी आहेत. – गोवर्धन जाधव, कनिष्ठ अभियंता, लघुपाटबंधारे विभाग