.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दिंडोरी तालुक्यात तीव्र निदर्शने करण्यात आली. दिंडोरी येथे नाशिक-कळवण रस्त्यावर तब्बल एक तास रास्ता रोको करत टाळ-मृदंगाच्या गजरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वाहतूक वळवली. आंदोलकांनी एकजुटीच्या घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. आंदोलनानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस उपअधीक्षक शेळके आणि पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मराठा समाजातील ज्या बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सर्व सगेसोयऱ्यांना तातडीने कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे, { उर्वरित पान. ३
या आहेत प्रमुख मागण्या {कुणबी नोंद असलेल्या मराठा बांधवांच्या रक्ताच्या नात्यातील सर्व सगेसोयऱ्यांना तातडीने कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे. {आरक्षणाअभावी शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांपासून वंचित राहणाऱ्या मराठा तरुणांना न्याय द्यावा. {अस्मानी-सुलतानी संकटांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी रोजगाराचा प्रश्न सोडवावा. {आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेले सर्व गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत. {विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्थेला पुरेसा निधी देऊन वसतिगृह व शिष्यवृत्तीच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात.