Headlines

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषण:आज आज श्रीगोंद्यामध्ये‎ मुक्काम; 400 पोलिसांचा बंदोबस्त‎




मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने‎ निघालेले मनोज‎ जरांगे पाटील यांचा आज श्रीगोंदे तालुक्यात मुक्काम ‎होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या‎ पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिस ‎यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.‎संभाव्य गर्दी लक्षात घेऊन श्रीगोंदे ‎शहर व तालुक्यात मोठा पोलिस‎ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎जरांगे पाटील बुधवारी रात्री श्रीगोंदे ‎शहरातील बाजार तळ परिसरात ‎दाखल होणार असून तेथे त्यांच्या‎ मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली‎ आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित‎ राहावी यासाठी पोलिस अधीक्षक ‎मुम्मका सुदर्शन यांनी बंदोबस्ताचे ‎नियोजन केले आहे. बंदोबस्तात ‎पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस‎ अधीक्षक, उपविभागीय पोलिस‎ अधिकारी व सर्व पोलिस‎ निरीक्षकांसह 50 अधिकारी, 350‎ पोलिस कर्मचारी, एसआरपीएफची‎ एक तुकडी आणि दंगल नियंत्रण‎ पथकाची एक तुकडी तैनात करण्यात ‎आली आहे. दरम्यान, पोलिस ‎अधीक्षक सुदर्शन यांनी मंगळवारी‎ सायंकाळी श्रीगोंद्यात भेट देऊन‎ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व‎दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ‎सूचना दिल्या. दोन दिवसांपूर्वीही ‎त्यांनी श्रीगोंद्यात येऊन तयारीचा ‎आढावा घेतला होता. बाजार तळ‎ परिसरात मराठा बांधवांकडून ‎स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.‎ दरम्यान, जरांगे पाटील यांच्या ‎‎स्वागतासाठी मराठा समाजाकडून ‎सुरू असलेली तयारी पाहता श्रीगोंद्यात ‎‎आज राजकीय-सामाजिक वातावरण ‎‎तापण्याची शक्यता आहे.‎प्रशासनासाठी गर्दीचा उत्साह कायम‎ ठेवत कायदा-सुव्यवस्था आणि‎ वाहतूक सुरळीत ठेवणे हीच खरी ‎कसोटी असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *