Headlines

लातुरात हॉटेलातील वादातून तरुणाचा खून:3 आरोपींमध्ये परळीचा नगरसेवक, मित्रानेच छातीत सुरा खुपसला, हत्येनंतर फरार आरोपींचा शोध सुरू



परळीहून लातूरात आलेल्या ४ मित्रांमध्ये हॉटेलमध्ये जेवताना झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना उस्मानपुरा भागात घडली. बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. बाबा अली शेख (३८, रा. परळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींमध्ये परळीचा नगरसेवक ख

.

बाबा अली शेख, खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर अशी चौघांची नावे आहेत. जेवताना बाबा अलीसोबत तिघांचा वाद सुरू झाला. चौघेही रस्त्यावर आले. तिथे एकाने बाबा अलीच्या छातीत चाकू खुपसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बाबा आणि आरोपींमध्ये अनेक वर्षांपासून वाद आहेत. त्यामुळे नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूनेच त्याला लातुरात आणले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मंत्री शहरात असताना घटना

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले लातूर शहरात मुक्कामी होते. ज्या वेळी हा खुनाचा थरार सुरू होता, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकातील गणेश मंडळात आरती करत होते. शहरात महत्त्वाच्या व्यक्तीची उपस्थिती असताना आणि पोलिसांचा बंदोबस्त असतानाही भररस्त्यात असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *