![]()
येथील ग्रामपंचायतीने राम मंदिरासाठी मंजूर केलेल्या जागेची साफसफाई व अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी अक्षय पवार यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. प्रशासनाने येत्या २७ सप्टेंबरपूर्वी अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीने ३१ डिसेंबर २०२५ रोजी ठराव क्रमांक ८१ अन्वये राम मंदिरासाठी जागा मंजूर केली होती. मात्र, आठ महिने उलटूनही जागेची साफसफाई न झाल्याने तेथे अस्वच्छता पसरली होती. याबाबत ग्रामपंचायत, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही कारवाई न झाल्याने १५ सप्टेंबरपासून अक्षय पवार यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी (१६ सप्टेंबर) जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी गटविकास अधिकारी ज्ञानदेव जायभाये, विस्तार अधिकारी अमेय पवार व ग्रामपंचायत अधिकारी भीमराज दाने यांना तत्काळ घटनास्थळी पाचारण केले. अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून २७ सप्टेंबरपूर्वी अतिक्रमण हटवण्याचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले.
Source link
खंडाळ्यातील राम मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठीचे उपोषण मागे