![]()
तालुका विधी सेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १२) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय घेण्यात आले. यात न्यायचौकशीपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण ११६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून एकूण पाच कोटी १७ लाख ७१ हजार ३३९ रुपये इतकी वसुली करण्यात आली. राष्ट्रीय लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण ११२३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३८ प्रकरणांमध्ये तडजोड झाल्याने ती निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात दंडरूपाने व बँक वसुलीतून २४ लाख ३८ हजार ६२ रुपये इतका महसूल जमा झाला. तसेच कौटुंबिक प्रकरणाचीही समजूत झाली. एकूण २०३४ प्रीलिटीगेशन (दाखलपूर्व) प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ११२८ प्रकरणांमध्ये तडजोड झाल्याने ती निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायतीची ११०२, बँका आणि वीजबिले प्रकरणे यांच्या एकूण २६ तडजोडीच्या निकाली प्रकरणांमध्ये एकूण चार कोटी ९३ लाख ३३ हजार २७७ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. न्यायचौकशीपूर्व आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण पाच कोटी १७ लाख ७१ हजार ३३९ रुपये इतकी वसुली होऊन ११६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी न्यायाधीश एच. बी. परदेशी यांनी पॅनलप्रमुख म्हणून, तर पॅनल मेंबर म्हणून अॅड. भैय्यासाहेब पटेल यांनी काम पाहिले. या लोकन्यायालयासाठी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिनकर ठाकरे, वकील संघाचे सदस्य, न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक जे. व्ही. कुलकर्णी आदींसह पॅनलवर नियुक्त करण्यात आलेले न्यायालयीन कर्मचारी, चांदवड व वडनेरभैरव पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, बँका, पतसंस्थांचे कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते. लोकन्यायालयात सहभागी नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्वरित न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
Source link
चांदवड लोकन्यायालयात 1166 प्रकरणे निकाली:पाच कोटी 17 लाख 71 हजार 339 रुपयांची वसुली, 1128 प्रकरणांमध्ये तडजोड